मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलने दिली. सोशल मीडियावर ही बातमी अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बातमी नजरेस पडताच जरांगे यांच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. न्यूज विथ कोमल असा या व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून त्याने मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल करून जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान नेमकी ही व्यक्ती कोण या घटनेचा अधिक तपास आता सायबर पोलीस करत आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
समाजकंटकांकडून सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांचं समर्थन करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय. तसेच कोणत्याही बातमीची पडताळणी केल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नये, असंही पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे.
मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि शंभुराद देसाई यांनी मंगळवारी अंतरवली सराटीला भेट दिली होती. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि शंभुराद देसाई यांनी मंगळवारी अंतरवली सराटीला भेट दिली होती. जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे.
Manoj Jarange काय आहे मनोज जरांगे यांची मागणी?
मराठा आरक्षणासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगे-सोयरे बाबत अमलबजाणी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटला नाही तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करू.