26.6 C
New York

Thane News : तरुणांची भरारी ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत !

Published:

महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येत गारद फाऊंडेशन, (Thane News)ठाणेच्या माध्यमातून मिशन भरारी फेस -२ या उपक्रमाअंतर्गत विक्रमगड येथील आदिवासी पाड्यातील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्याच्या किट्सचे वाटप केले.

विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या कमतरतेमुळे शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये या साठी मिशन भरारी फेस –२ च्या माध्यमातून एकूण दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. ब्राम्हणपाडा आणि म्हसरोली येथील व्हरनोल पाडा , अवचित पाडा , दुधडी पाडा , रायगुन पाडा , खंडीचा पाडा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याची किट उपलब्ध करून देण्यात आली. ज्यामध्ये बॅग , वह्या यांच्यापासून ते नवनीत व्याकरणमाला पुस्तिके पर्यंत वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.त्याचप्रमाणे पाड्यातील समस्या जाणून घेऊन रहिवाशांशी चर्चा करून “पाडा सक्षमीकरण” ह्यासाठी चर्चा संवाद देखील करण्यात आला.

महापारेषणची पदभरती रद्द, परीक्षार्थींचा संताप

आज सामाजिक कार्यासाठी तरुणांनी नवीन विचारांनी पुढे येऊन समाजाला आपलस करणं गरजेचं आहे म्हणून या मिशन भरारी या उपक्रमाची रचनाच महाविद्यालयिन तरुणांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मदत अशी करण्यात आली आहे.ज्यामध्ये संपूर्ण मदत ही क्राउड फंडींगच्या माध्यमातून केली जाते. यापूर्वी हाच उपक्रम पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात करण्यात आला होता असे संस्थेचे अध्यक्ष अभिषेक नेमाणे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img