8.3 C
New York

Accident : खरेदीसाठी गेलेल्या जवानांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू

Published:

जवानांच्या ऑटोला कन्हान शहरातून कामठीकडे येत असताना खासगी बसने धडक दिली. (Accident) या भीषण अपघातात दोन जीआरसी जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सहा जवान आणि ऑटोचालक असे सातजण गंभीर जखमी झाले आहेत. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना कन्हान नदीच्या पुलावर घडली. (factory) विघ्नेश आणि धीरज रॉय (२४) रा. गिलोरा तामिळनाडू अशी मृतांची नावं आहेत.

Accident साहित्य खरेदी

कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील काही जवान साहित्य खरेदीसाठी कन्हानला गेले होते. खरेदीनंतर दोन ऑटोने परतताना एमएच-४९/एआर-७४३३ क्रमांकाचा ऑटो कन्हान नदीच्या पुलावर असताना शिवनीला (मध्यप्रदेश) जाणाऱ्या पवन ट्रॅव्हल्स क्रं. एमएच-३१/एफसी-४१५८ क्रमांकाच्या खासगी बसने त्याला धडक दिली.

Accident सहा जवान गंभीर

यामध्ये ऑटोतील चालकासह सहा जवान गंभीर जखमी झाले. मागून ऑटोने येत असलेल्या सैनिकांनी सर्व जखमींना लगेच कामठी सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर पाच जवानांसह ऑटो चालकास नागपुरातील मेयोत हलवले तर तिघांना कामठीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

Accident गुन्हा दाखल

दरम्यान, दुर्दैवाने दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघे नागपुरातील मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी खासगी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बस चालक मधुकर विठ्ठलराव काळे, (वय ६०) याच्यावर जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident अपघातातील जखमींची नावे

कुमार पी., शेखर जाधव, मुरजम, अरविंद, नागारत्नम, बी. प्रधान अशी अपघातात जखमी झालेल्या जवानांची नावं आहेत. आटोचालक शंकर खरजबान रा.गोराबाजार हा गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img