बीड लोकसभेची निवडणूकअत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये राष्ट्रावादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. तर, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पराभूत झाल्या. (Beed Lok Sabha) दरम्यान, त्यांचा पराभव झाल्याचा धक्का बसल्याने दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. (Pankaja Munde) आज चिंचेवाडी येथील युवकाच्या घरी सांथवन करण्यासाठी पकंजा मुंडे आज गेल्या होत्या. यावेळी एकच कल्लोळ झाला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील ढसा-ढसा रडल्याचं पाहायला मिळालं.
Pankaja Munde आत्महत्या करू नका
पंकजा मुंडे चिंचेवाडी येथे असताना पुन्हा एका समर्थकाने लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे आज घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचं गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं नाव आहे. या अगोदरही दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आत्महत्या करू नका असं आवाहन केलं होतं.
विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा ठाकरेंना टोला
पंकजा मुंडे चिंचेवाडी येथे असताना पुन्हा एका समर्थकाने लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे आज घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचं गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं नाव आहे. या अगोदरही दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आत्महत्या करू नका असं आवाहन केलं होतं.
Pankaja Munde मी पराभव स्वीकारला
पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना या घटना घडत असताना वारंवार आवाहन करत आहेत. ज्याचे माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही तोच स्वतः च्या जीवाला धक्का लावेल. मी लढत आहे संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणं कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दु:खी वाटत आहे. मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Pankaja Munde पराभवाने खचून जाऊ नका
लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे या प्रथमच शहरात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत आपला पराभाव झाला असला तरी तुम्हीच आमच्या नेत्या आहात. अशी भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंडे म्हणाल्या पराभवाने खचून जाऊ नका. अंधारानंतर प्रकाश असतो. तुम्ही माझ्यासाठी प्रकाश आहात. कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.