26.6 C
New York

Saurabh Netravalkar : ‘या’ खेळाडूंमुळे सौरभ भारतीय संघाबाहेर ?

Published:

भारतीय संघासाठी हा विश्वचषक T20 World Cup तसा बघायला गेल्यास अजून तरी चांगलाच चालू आहे. भारतीय संघातील खेळाडू आपल्या प्रेक्षकांवर देशासाठी खेळून आपल्यावर प्रेम करायला भाग पाडत आहेत. मात्र एक खेळाडू असा आहे की, तो सध्या भारतासाठी खेळत नसला तरी भारतीय प्रेक्षकांवर स्वतःची भुरळ पाडण्यात यशस्वी ठरला आहे. त्या खेळाडूच नाव आहे सौरभ नेत्रावळकर(Saurabh Netravalkar)… सौरभ सध्या अमेरिकन संघासाठी खेळत असला तरी, भारतीय संघासाठी त्याचे मोठे योगदान आहे. 2010 मध्ये त्याने अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. त्यावेळी तो आई किंवा वडिलांसोबत क्रिकेटच्या सरावासाठी मुंबई लोकलहून चर्चगेटला जात असे. मुंबईच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सोडून अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले, परंतु आता तो निर्णय घेण्यापूर्वी दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यास स्वतः सौरभने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितल्या.

अंडर-19 विश्वचषक खेळलेल्या सौरभने कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करण्यासाठी खेळ सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. सौरभ सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. अभ्यास आणि क्रिकेट यापैकी एक गोष्ट निवडण्यासाठी त्याने पालकांकडे दोन वर्षाची वेळ मागितली होती. जर त्याने दोन वर्षांत व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले नाही तर तो अभ्यास आणि कामावर लक्ष केंद्रित करेल, असे सांगत त्याने पालकांना आश्वस्त केले. मात्र त्यावेळी झहीर खान, अजित आगरकर, अविष्कार साळवी आणि धवल कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई रणजी संघात स्थान मिळणे अवघड झाले. तेव्हा नेत्रावळकरच्या लक्षात आले की आपल्याला क्रिकेट सोडून कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पण त्यातही मोठी अडचण होती. सौरभ सांगतो, “अंडर-19 विश्वचषक स्पर्धेनंतर मला बीपीसीएलमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली होती जिथे त्यांनी मला विविध चाचण्या घेण्यास सांगितले. त्यापैकी एक डोळ्यांची चाचणी होती. जिथे ते स्क्रीनवर वेगवेगळे रंग दाखवतात आणि तुम्हाला ते ओळखण्यास सांगितले जाते. त्या चाचणी अहवालात त्यांनी मला रंगाच्या बाबतीत समस्या असल्याचे समोर आले. शेवटी 2016 मध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर मी मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला.”

बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?

अमेरिकेला गेल्यानंतर सौरभने क्रिकेटची आवड जोपासण्याचे ठरवले. तो त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या प्रशस्त जिममध्ये आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करतो. सौरभ सांगतो, “संध्याकाळी काम संपल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जात नाही, तर सरावासाठी जातो. आठवड्याच्या शेवटी क्लबचे सामने खेळले जातात, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी शुक्रवारी फ्लाईटने प्रवास करून सोमवारी पुन्हा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी हजर होतो. माझ्या कामाच्या प्रामाणिकपणामुळे माझ्या क्रिकेटच्या आड माझे काम कधी येत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img