19.7 C
New York

Mandira Bedi: “दत्तक मुलीला आणलं थेट प्रायव्हेट जेटने…”,मंदिरा म्हणाली, हेच…

Published:

Mandira Bedi: मंदिरा बेदी (Mandira Bedi) ही केवळ टीव्ही सिरीयल नाही तर चित्रपट आणि क्रीडा विश्वातसुद्धा प्रसिद्ध आहे. ९०च्या दशकातला टीव्ही शो ‘शांती’ (Shanti) या मालीकेतून मंदिराने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली. मंदिरा बेदी अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या कामामुळे चर्चेत असते. आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने आपल्या मातृत्वाबद्धल सांगितलं आहे. मंदिरा बेदीला १३ वर्षाचा मुलगा आहे. पहिला मुलगा झाल्यानंतर मंदिराला दुसरं मूल हे दत्तक घ्यायचं होत आणि काही वर्षांनी कागदपत्रांची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिने दिवंगत पती राज कौशलबरोबर मुलगी ताराला दत्तक घेतलं. आता अशातच मंदिराने ताराला दत्तक घेताना आलेल्या अडचणीं व कोरोना काळात त्यांनी ताराला प्रायव्हेट जेटने (Private Jet) कस घरी आणलं याबद्धलचा अनुभव शेअर केला आहे.

Mandira Bedi: मंदिराने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “मला दुसरं सुद्धा मूल हवं होत, पण ते मला दत्तक घ्यायचं होत. माझा मुलगा वीर हा सहा वर्षांचा असताना मी दत्तक मूल घेण्यासाठी अर्ज केला होता, ही एक मोठी प्रक्रिया आहे. पण ती प्रक्रिया का मोठी आहे, त्याची कारण मला माहिती आहेत, पण मला असं वाटत की दत्तक घेणार कुटुंब जेव्हा चांगलं असेल तर तेव्हा ती प्रक्रिया सोपी असावी असं मला वाटत. पण यासाठी खूप वेळ लागला आणि वीर ९ वर्षाचा झाला आणि त्याच वेळी कोरोनाची साथ आली. मी राजला म्हणाली, ‘ही प्रक्रिया अजूनही का झालेली नाहीये?’ आम्ही या प्रक्रियेचा जास्त काही पाठपुरवठा केला नव्हता. पण त्यावेळी अशी वेळ आली की मी मात्र ठरवलं हे सर्व आताच व्हायला पाहिजे नाहीतर, कधीच नको.”

‘चंदू चॅम्पियन’ची पहिल्याच विकेंडमध्ये अफाट कमाई

या सर्व प्रक्रियेदरम्यान मंदिराला लेक ताराचा फोटो मेलवर आला होता. तिचा फोटो पाहताच मंदिरा आणि राज दोघांनी सुद्धा तिलाच दत्तक घ्यायचं असं ठरवलं. राज कौशल (Raj Kaushal) ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकटेच जबलपूरला गेले तर मंदिरा कोरोनामुळे वीरबरोबर तिच्या घरीच थांबली. राज यांनी कागदपत्रांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ताराला घरी घेऊन येण्यासाठी मंदिरा आणि वीर एका प्रायव्हेट जेटने मुंबईमधून जबलपूरला गेले. त्यांनतर मंदिरा विमानतळावर ताराला भेटली आणि तिला प्रायव्हेट जेटनेच मुंबईला घेऊन आली.

पुढे मंदिरा म्हणाली, हेच तर नशीब असतं. याआधी कधीही कारमध्ये प्रवास न केलेल्या मुलीने आज थेट प्रायव्हेट जेटने प्रवास केला. आणि हे तिच्या नशिबात होतं. आम्ही खरं तर प्रायव्हेट जेट वापरले नसते, परंतु त्यावेळी कोरोनाची साथ असल्यामुळे व्यावसायिक विमानाने प्रवास करणं अत्यंत धोकादायक होतं. त्यामुळे त्यावेळी आमच्यासाठी तो एकमेव असणारा मार्ग होता.

लेक ताराला दत्तक घेतल्यानंतरची परिस्थिती मंदिरा बेदीने सांगितली. मंदिराचा मुलगा वीर ६ वर्षांचा असताना त्याला बहीण हवी होती, पण तो ९व्या वर्षी फारसा उत्सुक नव्हता. त्यामुळे मंदिराला तिच्या निर्णयावर शंका आलेली. “एक चिमुरडी आमच्या आयुष्यात येणार आणि आता आमचं आयुष्य बदलणार हा विचार करून मी खूप भारावून गेली होती. वीर रडत होता आणि मीसुद्धा रडत होते. राज सोबत प्लॅस्टिकची टोपी घातलेली ही चिमुरडी आम्हाला विमानतळावर पोहोचल्यावर भेटली. ती खूप लहान होती. ताराला कुटुंबात सगळ्यांसोबत मिसळायला आणि वीरला तिला स्वीकारण्यासाठी खूप वेळ लागला,”असा अनुभव मंदिराने सांगितला. आता वीरने ताराला बहीण म्हणून पूर्णपणे स्वीकारलं आहे आणि ते दोघंही भावंडं एकमेकांवर खूप जास्त प्रेम करतात, असं मंदिराने स्पष्ट सांगितल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img