4.2 C
New York

Sonakshi Sinha: कोणतीच नाराजी नाही! सोनाक्षीच्या मामांचा खुलासा

Published:

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत आहे. सोनाक्षी येत्या २३ जूनला बॉयफ्रेंड झहीर इकबालशी (zaheer Iqbal) लग्न करणार असल्याचं म्हंटल जातंय. सोनाक्षी आणि झहीरची डिजिटल लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुंबईमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा होणार असल्याचं बोललं जातंय. हनी सिंग (Honey Singh) आणि पूनम ढिल्लॉन (Poonam Dhilon) यांसारख्या सेलिब्रिटींनी लग्नाच्या चर्चाना दुजोरा दिला आहे. मात्र सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांनी अद्याप ह्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. तर दुसरीकडे ह्या दोघांच्या लग्नाला तिच्या आईवडिलांकडूनच नकार असल्याचं म्हंटल जातंय. लाडक्या लेकीच्या लग्नाविषयी मला काहीच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatughan Sinha) यांनी दिली. अशातच आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या व्यक्तीने या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे.

Sonakshi Sinha: चित्रपट निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सोनाक्षीच्या कुटुंबाचे निकटवर्तीय पहलाज निहलानीयांनी (Pahlaj Nihalani) तिच्या लग्नाबद्धल माहिती दिली आहे. येत्या २३ जूनला सोनाक्षीचं लग्न होणार असून ते सुद्धा लग्नाला उपस्थित राहणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. लाडक्या लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा येणार नसल्याच्या चर्चवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“दत्तक मुलीला आणलं थेट प्रायव्हेट जेटने…”,मंदिरा म्हणाली, हेच…

सोनाक्षी ही पहलाज निहलानी यांना तिचे मामा मानते. दिलेल्या मुलाखतीत निहलानी म्हणाले, की “मामाच्या उपस्थितीशिवाय लग्न होऊ शकत नाही. शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या मुलीच्या लग्नाविषयी काही माहिती नसल्याचं म्हणाले, कारण लोकसभा निवडणुकीच्या काळात ते तीन महिने बाहेरच होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि इतर कामात ते प्रचंड व्यस्त होते. या कालावधीत सोनाक्षीची आई पूनम यांनी त्यांना लग्नाविषयीची माहिती वेळोवेळी देत होत्या. सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तिचे वडील आणि सर्व कुटुंबीय या लग्नाला उपस्थित राहतील.”

लेकीच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा हे नाराज होते अशी कबुली पहलाज निहलानी यांनी या मुलाखतीत दिली. मात्र ते आपली लाडकी मुलगी सोनाक्षीवर फार काळ नाराज राहू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. आपल्या मुलीने तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यावरून वडील कशाला नाराज असतील, असा प्रश्नही त्यांनी केला. स्वतः शत्रुघ्नजी यांनी चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. मग आता ते मुलीवर का नाराज होतील”, असं निहलानी यांनी सर्व घडामोडींवर पूर्णविराम दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img