1 C
New York

West Bengal train accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

Published:

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात (West Bengal train accident) झाला आहे. दार्जिलिंग जिल्ह्यामधील न्यू जलपायगुडी स्थानकाजवळ कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून प्राथमिक माहितीनुसार कांचनजंगा एक्स्प्रेस अपघातात 5 ठार; 25 जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तातडीनं बचाव पथकं आणि मदतकार्य करणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेसंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. हा ट्रेनचा अपघात एवढा भीषण होता की अनेक डबे एकमेकांवर चढल्याचं चित्र घटनास्थळी आहे. दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस (West Bengal Kanchenjunga Express train accident ) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.

केनिया मारणार दहा लाख भारतीय कावळे

West Bengal train accident अपघातस्थळी बचाव पथकं रवाना, ममता बॅनर्जींचं ट्विट

रेल्वे दुर्घटनेची माहिती ऐकून धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे. बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

West Bengal train accident नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालवाहकडे जात होती. त्यावेळी पॅसेंजर रेल्वे आणि कंचनजंगा एक्स्प्रेस यांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बेल ट्रॅकवरुन खाली घसरले. आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही दुर्घटना झाली. कंचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला जाऊन धडकली.दरम्यान, सध्या या अपघातात किती प्रवासी जखमी आहेत, याचे माहिती उपलब्ध झालेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img