1.7 C
New York

Pub and Bar Entry rules : बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा

Published:

मद्यप्रेमींसाठी शासनाने आता नियम तयार केले आहे. (Pub and Bar Entry rules) शासनाप्रमाणे आता पब अन् बार मालकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकारानंतर आता बार अन् पबमध्ये मद्य पिण्यासाठी बदल करण्यात आले आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत दोघांना उडवले होते. त्यानंतर या प्रकरणात अनेक बाजू समोर आल्या. हे प्रकरण पोलीस अन् प्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु या प्रकरणात नऊ पेक्षा जास्त लोकांना माध्यमे अन् जनतेच्या रेट्यामुळे अटक झाली होती. पोलीस अन प्रशासनावर या प्रकरणात सडकून टीका झाली. त्यामुळे आपलीच कठोर नियमावली खळबळून जागे झालेल्या पब अन् बार चालकांनी आता तयार केली आहे. मुंबई अन् पुण्यात मद्य अन् वाईन पितांना यामुळे वयाचा पुरावा लागणार आहे.

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील 3 मजली इमारतीला आग

Pub and Bar Entry rules काय आहे नियम

पुणे, मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरात मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलांकडून वाहने भरधाव वेगाने चालवण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे आता मुंबई पुण्यात बार अन् पबमध्ये दारु पिण्यापूर्वी वयाचा पुरावा तपासला जाणार आहे. सरकारी ओळखपत्रातील वय त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. बार अन् पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळू नये, प्रवेश द्वारावरच यासाठी ओळखपत्र तपासले जाणार आहेत. वाईन अन् बियर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारू पिण्यासाठी २५ वर्ष वय बंधनकारक असणार आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय अनेक पब चालकांनी घेतला आहे.

Pub and Bar Entry rules पुणे पोर्श अपघात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये विशालवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस विशाल अग्रवाल याला याप्रकरणी कधी ही अटक केली जाऊ शकते. ब्रम्हा सोसायटीने बावधन येथील ज्ञानसी हा गुन्हा दाखल केला आहे. विशाल याने पुढची पूर्तता 2010 साली पजेशन देऊन ही केलेली नाही. सोसायटीत ठरलेल्या सुविधा, मोकळी जागा, कंव्हीन्स डिड लेटर अद्याप दिले नाही. तसेच आवारातील रिकन्स्ट्रक्शनसाठी सोसायटीसाठी परवानगी घेतली नाही. याप्रकरणी सोसायटी आणि विशाल अग्रवालचे वाद सुरू होते. पोर्श प्रकरणात त्याचे कारनामेसमोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी हा ही गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या विशाल अग्रवाल याला या प्रकरणात कधी ही अटक केली जाऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img