1 C
New York

Nagpur Hit And Run : नागपूरमध्येही हिट अँड रन, कारने 9 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

Published:

हिट अँड रनच्या दुर्दैवी घटना राज्यात आणखीही घडल्याचे समोर येत आहे. (Nagpur Hit And Run) पुण्याप्रमाणेच उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राइवचे प्रकार वाढले आहे. यात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळाला. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली व कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली.

या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली. रस्त्याव झोपलेले मजूर हे रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करत होते. यात त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. सर्व मजूर जेवण करून झोपले असतांना काररूपी काळाने त्यांच्यावर घाला घातला दारूच्या नशेत चालकाने फुटपाथवर गाडी चढवली. यावेळी गाडी मागे पुढे करण्याच्या नादात मजुरांचा मृत्यू झाला.हिट अँड रन प्रकरणातील गाडीत सात जण होते.नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघातावेळी आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ काल मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या बंजारा परिवारातील लोकांना या कारने चिरडले. हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये ५ जण असल्याची माहिती आहे. त्या सर्वांनी दारू प्यायली होती असा पोलिसांना संशय असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यावर खरं काय ते स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या सांगण्यानुसार, अपघातावेळी ही कार खूप वेगात होती. कार वेगाने आल्यानंतर घराच्या दिशेने शिरली. या कारमध्ये काही लोक होते. फूटपाथवर बरेच लोक झोपले होते. तर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमींना या अपघातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img