1.7 C
New York

Rain : पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Published:

राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. (Rain) काल राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Rain 48 तासांत जोरदार पाऊस

राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. मुंबई, पुणे शहरात सोमवारी सकाळापासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही विजाच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे.

बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

Rain मराठवाड्यात मोठा पाऊस

कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तर, खान्देश आणि पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. धाराशिव, तुळजापूर आणि उमरगामध्ये पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

Rain राज्यात 20 जूननंतर पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Rain उत्तर भारतात उष्णतेची लाट

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. अनेक भागात तापमान 50 डिग्रींवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 36 लोकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये तब्बल 128 वर्षांतील रेकॉर्ड उष्णतेने मोडले गेले आहे. वाराणसी प्रयागराज कानपूरमध्ये तापमान 46 अंशावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img