10.6 C
New York

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा ?

Published:

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळही कामाला लागले आहे. परंतु लोकसभा अध्यक्षपदावरून (Lok Sabha Speaker) जोरदार चर्चा सुरू आहे. एनडीएतील दोन मोठे घटक पक्ष असलेले नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू ( (Chandrababu Naidu) यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) यांना अध्यक्षपद हवं आहे, अशा चर्चा होत्या. परंतु आता नितीश कुमार यांच्या जेडीयूने हा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर एनडीएतील सर्व पक्षांच्या निर्णय घेऊन अध्यक्ष निवडले जातील, अशी भूमिका टीडीपीने घेतलीय.

जेडीयूचे नेते केसी त्यागी अध्यक्षपदाबाबत म्हणाले, हे पद महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदावर सत्ताधारी पक्षाचा हक्क आहे. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे या पदावर पहिला हक्क भाजपचा आहे. आम्ही 35 वर्षांपासून एनडीएबरोबर आहे. भाजपने जेडीयू पक्ष फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर दुसरीकडे टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ता पत्ताभी राम कोम्मारेड्डी यांचीही भूमिका समोर आली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना कोम्मारेड्डी म्हणाले, एनडीएचे सर्व घटकपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील की अध्यक्षपदाचा उमेदवार कोण राहणार आहे. एकदा घटक पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्या उमेदवाराला आम्ही मैदानात उतरू. त्या उमेदवाराला टीडीपी पाठिंबा देईल.

केनिया मारणार दहा लाख भारतीय कावळे

Lok Sabha Speaker अशोक गेहलोतांचा टीडीपी आणि जेडीयूला केले सावध

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 12 जून रोजी एक ट्वीट करत टीडीपी आणि जेडीयूला सावध केले आहे. आगामी काळात भाजपच्या मनात काही नसेल तर त्यांनी घटक पक्षांना अध्यक्षपद दिले पाहिजे. महाआघाडीचा धर्म पाळताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात टीडीपी आणि शिवसेनाला अध्यक्षपद दिले होते. यूपीए सरकारच्या काळात 2004 ते 2009 मध्ये सीपीआय (एम) पक्षाला अध्यक्षपद दिले गेले होते, असे गेहलोत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, राजस्थानमध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपने कशा खेळ्या केल्या होत्या हे टीडीपी आणि जेडीयूने लक्षात ठेवावे, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img