9.5 C
New York

Chandu Champion Collection : ‘चंदू चॅम्पियन’ची पहिल्याच विकेंडमध्ये अफाट कमाई

Published:

Chandu Champion Collection : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (kartik Aryan) ‘चंदु चॅम्पियन’ (Chandu Champion) हा चित्रपट १४ जूनला रिलीज झाला असून चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट रिलीज व्हायच्या आधीपासूनच ‘चंदू चॅम्पियन’ची अफलातून चर्चा सुरु होती. आता पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. पहिल्या दिवशी चित्रपटाने कमी कमाई केली परंतु रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी अगदी दमदार कमाई केल्याचं पाहायला मिळतंय. ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटाची कथा पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाई बद्धल.

Chandu Champion Collection : दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनी ‘चंदू चॅम्पियन’मार्फत महाराष्ट्राच्या मातीत घडलेली जिगरबाज माणसाची कहाणी संगळ्यांन समोर आणली आहे. भारताला पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांची प्रेरणादायी असणारी गाथा आपल्याला सिनेमात पाहायला मिळतेय. मुरलीकांत यांना भारत-पाकिस्तान युद्धामध्ये ९ गोळ्या लागून त्यांच्या वाटेल अपंगत्व आलं. मुरलीकांत पेटकर यांची भूमिका कार्तिक आर्यन याने स्वीकारली आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकमध्ये एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर झालेल्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर सुद्धा जलतरणपट्टू होण्यापर्यंतचा चकित करणारा प्रवास ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी दाखवलेली ही सगळी किमया आहे. या चित्रपटाची देशातच नाही तर परदेशात सुद्धा चर्चा सुरु आहे. ‘चंदू चॅम्पियन’या चित्रपटाचे देशां ३ दिवसात २२ कोटींची कमाई केली आहे.

सलमान खानला पुन्हा धमकी आरोपीला राजस्थान मधून अटक

कार्तिक आर्यांच्या बहुचर्चित चित्रपटाने पहिल्या दिवशीच ४. ७५ कमाई केली, दुसऱ्या दिवशी ६.७५ कोटी तर तिसऱ्या दिवशी १० कोटींचा गल्ला कमवला आहे. या सिनेमाचा बजेट १२० कोटी रुपये असल्यामुळे ओपनिंग डे ची ही कमाई खूप कमी मानली जात होती. पहिल्या दिवशी चित्रपटाचं तिकीट १५० रुपयांना मिळत होत. तिकीट कमी असूनही ‘चंदू चँपियन’ला भरभरून प्रेक्षक जमवता आले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी विकेंडचा फायदा सिनेमाला मस्त मिळाला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे एकूम कलेक्शन ६ कोटी रुपये होते आणि एकूण चित्रपटाने २ दिवसात ११ कोटींची कमाई केली आहे. नंतर चित्रपटाने ३ दिवसात देशात २२ कोटींची कमाई केली आहे तर जगभरात २६ ते २७ कोटींच्या आसपासची कमाई केली.

सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या ‘चंदू चॅम्पियन’ ह्या चित्रपटाची कथा त्यांच्या जीवनावर आधारित आहे. मुरलीकांत यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, यशपाल शर्मा, विजय राज, राजपाल यादव, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img