घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ, गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडं सापडल्याचं सांगत मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) गाय तस्करीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून प्रशासनाने ११ घरांवर बुलडोझर फिरवलं आहे. (Beef) येथील आदिवासीबहुल जिल्हा असणाऱ्या मांडलाच्या नैनपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. (Ncert) तसंच, घरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ होता, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Madhya Pradesh एकाला अटक
पोलीस प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे ही सगळी घरं सरकारी भूखंडावर होती. 11 लोकांविरोधात याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नैनपूरमधील भैन्सवाही गावात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घरांवर छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने 11 आरोपींपैकी एकाला अटकही केली आहे. वाहिद कुरेशी असं या आरोपीचं नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानही करण्यात आली आहे. आरोपींपैकी 5 ते 6 आरोपींचा याआधीही गाय तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
खरेदीसाठी गेलेल्या जवानांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू
Madhya Pradesh घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या
हा 15000 चौरस फुटांचा भूखंड चराई क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केला होता. त्यावर ही घरं बांदण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली अशी माहिती मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी दिली.
Madhya Pradesh 150 गायीदेखील ताब्यात
या गावात याआधीही गाय तस्करीची 5 ते 6 प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांसह आम्ही कारवाई केली. येथे टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याशिवाय जवळपास 100 जनावरं, जनावरांची हाडं तिथे सापडली. त्याशिवाय जवळपास 150 गायीदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत असंही सकलेचा म्हणाले आहेत.