बांगलादेशने नेपाळ संघाचा 21 धावांनी पराभव केला आहे. बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. नेदरलँड्ससंघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता बांगलादेशचा संघ 22 जून रोजी सुपर-8 मध्ये भारताशी भिडणार आहे. बांगलादेशने नेपाळविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 106 धावा केल्या. त नेपाळचा संघ याला प्रत्युत्तरा 85 धावांत ऑलआऊट झाला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवात खूपच खराब झाली. कुशल भुरटेल अवघ्या चार धावा करून बाद झाला. यानंतर अनिल कुमार खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. बांगलादेशच्या तनझिम हसन शाकिबने नेपाळविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
‘या’ मत मोजनीवर अनिल परबांचा दावा खळबळजनक
कर्णधार रोहित पौडेल आणि सुदीप जोरा यांना देखील काहीशी मोठी खेळी करता आली नाही. काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी प्रयत्न केला, मात्र या दोन्ही खेळाडूंना मुस्तफिझूर रहमानने बाद केले. शेवटच्या षटकात विजयासाठी 22 धावांची नेपाळला गरज होती. पण त्यानंतर सोमपाल कामी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर अविनाश बोहरा दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. केवळ 85 धावा नेपाळचा संघ करू शकला.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी 107 धावांचा बचाव करून दक्षिण आफ्रिकेचा विक्रम मोडीत काढला आहे. आफ्रिकन संघाने टी-20 विश्वचषक 2024 मध्येच बांगलादेशसमोर 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नेपाळविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने चार बळी घेतले. तो संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याच्याशिवाय मुस्तफिजुर रहमाननेही सामन्यात 3 बळी घेतले.