21.7 C
New York

Pune Hit And Run Case : आळंदीत अल्पवयीन मुलाकडून महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Published:

आळंदी परिसरात असाच हिट अँड रनचा प्रकार (Pune Hit And Run Case) समोर आला आहे. अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्याात आला आहे. पूर्ववैमनस्यातून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आळंदी जवळील वडगाव घेणंद हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा थरार मनात धडकी भरवणारा हा व्हिडीओ आहे. सुदैवाने महिलेला कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र तरुणाच्या या मुजोरगिरीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Pune Hit And Run Case आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल

पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली. नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नागपूरमध्येही हिट अँड रन, कारने 9 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

Pune Hit And Run Case पुण्यात अपघाताची मालिका सुरूच

पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात 25 दिवसात 70 अपघात झाले आहेत. 70 अपघातात तब्बल 31 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विविध परिसरात अपघात झाला आहे. 54 जण गंभीर आणि किरकोळ जखमी आहेत. पुण्यातील वाहनांचा वेग घेतोय जीव आहे. अपघातातील चालक मद्यपी आहेत . काही वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काही चालक फरार आहे. पुण्यातील वाढत्य अपघातावर पुणे शहर पोलिस अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, प्रत्येक अपघात महत्त्वाचा आहे, प्रत्येकाचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पालकमंत्र्यांनी या संदर्भात एक बैठक घेतली आहे. सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेसोबत काम होईल. कल्याणीनगर अपघात झाल्यानंतर 920 ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस दाखल केल्या आहेत. पुणे शहरात अपघाताचे 22 ब्लॅक स्पॉट आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img