21 C
New York

Muralidhar Mohol : पुरंदर विमानतळ कधी होणार? मोहोळांनी सांगितली डेडलाईन

Published:

देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन झाले असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) 9 जून ला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेतली. त्यामध्ये मंत्रिपद मिळालेल्या खासदारांमध्ये राज्यातील पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना (Muralidhar Mohol ) नागरी उड्डाण खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मोहोळ नुकतेच पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी पुरंदर विमानतळ ( Purandar Airport ) कधी होणार? याबद्दल माहिती दिली आहे.

मोहोळ म्हणाले की, डीजीसीए ची मान्यता पुरंदर विमानतळाला मिळाली आहे या प्रकल्पासाठी तसेच भूसंपादनाचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.पुण्यातील या टर्मिनल च्या कामासाठी सीआयएसएफची सिक्युरिटी गरजेची त्याबाबत अमित शाह यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे. पुरंदरच विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. कारण डीजीसीएने पुरंदर एयरपोर्टला मान्यता दिली आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

शेततळ्याने घेतला 3 चिमुरड्यांचा जीव!

तसेच त्यांनी यावेळी दिल्लीमध्ये शपथविधीच्या दरम्यान झालेल्या बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीतील काही किस्से सांगितले. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की मला दीड दिवसाची शपथविधीनंतर सुट्टी मिळाली आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलो असलो तरी मला नऊ वाजेपर्यंत माहिती नव्हतं की, मला मंत्रिपद मिळेल मात्र मी महाराष्ट्र सदनमध्ये आराम करत असताना मला अचानक फोन आला. त्यामुळे आता मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी पार पाडेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img