23.1 C
New York

Ahmednagar : शेततळ्याने घेतला 3 चिमुरड्यांचा जीव!

Published:

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आताही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील सोमनाथ बढे (Somnath Badhe) यांच्या शेतातील अर्धवट अवस्थेतील शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. 1) अनुष्का बढे 11 वर्षे, 2) सृष्टी ठापसे वय तेरा वर्षे, 3) वैष्णवी जाधव वय 12 वर्ष अशी मृत मुलींची नावे

मराठवाड्यातील धरणांमध्ये राहिलाय अत्यल्प पाणीसाठा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतात खाजगी शेततळ्याचं काम सुरु होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद आहे. त्यामुळं शेततळ्याचं काम अर्धवट झालं आहे. आता या शेततळ्यात काही पाणी साचलेलं आहे. दरम्यान, आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर तिन्ही मुली शाळेतून घरी आल्या आणि जेवण करून त्या सोमनाथ बढे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेल्या.

या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. ह्या मुली पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असतांना खोलगट असलेल्या भागात जाऊन तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मुलींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img