5.5 C
New York

Sanjay Raut : नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर ( Lok Sabha Elections ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुंबईत प्रसार माध्यमांची बोलताना पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. नरेंद्र मोदींचा काय ताम जाम राहिलाय मला सांगा. टेकूवर बसले आहे. टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, असे भाकित खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे.

संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडू यांनी उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देऊ. देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारले आहे नाकारले आहे. भाजपचा पराभव केला. मोदींच्या झुंडशाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केला आहे. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. पारदर्शक पद्धतीने उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने घटनेने विरोधी पक्षाला मिळाला हवे. आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे, मला सांगा. ते सध्या टेकूवर बसले आहेत. ते टेकू कधीही पडू शकतात. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो असे संजय राऊत म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षाची बैठक बोलून भाजपासह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आले ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो असे संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img