रमेश तांबे, ओतूर
कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचे वाहन पोलिसांनी पकडून 73 जनावरांची सुटका केली. ही कारवाई ओतूर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अवैध कत्तलीसाठी (Rescue Of Animals) घेऊन जाणाऱ्या पाच ट्रकवर ओतूर पोलिसांनी कारवाई केली असून, याप्रकरणी ओतूर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ट्रकसह लहान मोठे असे एकूण ७३ जनावरे असा ६० लाख ४९ हजार रूपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
सदरची कारवाई शनिवारी दि.१५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीसांनी मोहम्मद वकील इकरार खान, तोहीत वाहीद कुरेशी, उस्मानखान रमजानखान, रशीद अब्दुल रहीम शेख, फिरोज सोहराब मलीक, फारूक कुरेशी, मोहम्मद बिलाल भाईमिया शेख यांचे विरूद्ध ओतुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम १९९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना थाटे म्हणाले की, ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमधील खुबी ता.जुन्नर,जि, पुणे येथे नाकाबंदी नेमण्यात आली होती. नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान एकुण ५ ट्रक चे पाठीमागील हौद्यामध्ये लहान-मोठे असे एकुण ७३ म्हैस जनावरे त्यांना वेदना होईल अशा परिस्थीतीत दाटीवाटीने चारा-पाण्याची व्यवस्था न करता, रस्सीच्या साह्याने कृरतेने जखडुन बांधुन, जनावरांचे वाहतुकीचा परवाना नसताना, वैद्यकीय अधिकारी यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना तसेच जनावरांना इयर टॅगिंग केले नसताना बकरी ईदचे अनुशंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विकणेसाठी वाहतुक करून घेवुन जात असताना मिळुन आले. त्यापैकी २ म्हैस जनावरे ट्रकमध्ये मयत अवस्थेत मिळुन आले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे,पोलीस उपनिरीक्षक अजीत पाटील, अनिल केरूरकर, पो.कॉ. ज्योतीराम पवार,पो.कॉ.सुभाष केदारी, शामसुंदर जायभाये, विश्वास केदार, पो.हवा. धनंजय पालवे, भरत सुर्यवंशी,पो.हवा.महेश पटारे,सहा. फौज.महेशकुमार झणकर, पो. हवा. दिनेश साबळे, शंकर कोबल,सुरेश गेंगजे, बाळशीराम भवारी,नामदेव बांबळे, विलास कोंढावळे,नदीम तडवी,संदिप लांडे, रोहीत बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे, आशीष जगताप, विशाल गोडसे, अंबुदास काळे, राजेंद्र बनकर, भारती भवारी, सिमा काळे तसेच पोलीस मित्र शंकर अहिनवे यांनी केली आहे.