नवी दिल्ली: प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा होत असते, यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वीही अशीच चर्चा रंगली होती. त्या उत्तर प्रदेशातील रायबरेली किंवा अमेठी अथवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील, अशी अटकळ होती. पण त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून आपली खासदारकी कायम ठेवली तर केरळातील वायनाडची जागा सोडवी लागेल, त्यानुळे तिथे लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागेल. तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
ठाकरे, पवार राजकारण गाजवणारी ‘बाप’ माणसं
राहुल गांधी यांनी म्हटले होते की, वाराणसीमध्ये प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांनी दोन-तीन लाख मतांनी पराभवाला केला असता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वी गांधी बहीण- भावाला निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेण्याचे आवाहन करतानाच दोघांनीही निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी शेवटी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता निवडणूक लढवून वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्यास गांधी घराण्यातील तिघेजण एकाच वेळी संसदेत दिसतील. कारण सोनिया गांधी यापूर्वीच राज्यसभेच्या सदस्या आहेत.