21 C
New York

Nilesh Lanke : पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पुढे ढकला…

Published:

राज्यात मान्सूनचे (Monsoon 2024) आगमन झाले असून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी (Police Bharti 2024) मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करणे कठीण जात आहे. यामुळे पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पावसाळ्याच्या अभावी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये लंके यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने नुकतीच 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. सध्या पावसाळा ऋतू असल्याने दिवसभर पावसाचे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण आहे. तसेच हवामान खात्याने देखील पुढील काही दिवस पावसाचे वातावरण सांगितले आहे. पावसाचे वातावरण व काही ठिकाणी पाऊस झाल्याने पोलीस भरती मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मुख्यमंत्री पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत

भरती प्रक्रियेसाठी मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रॅक्टिस करता येईना. तसेच यापूर्वी मोकळे मैदानावरती प्रॅक्टिस केलेल्या असून पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावरती मैदानी चाचणी त्यांना कठीण जाणार आहे. मैदानावरती चिखल झाला असून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना उमेदवारांना दुखापत होऊ शकते. मैदानी चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस आल्याने भरती प्रक्रिया प्रभावित होऊन त्याचा परिणाम वर्षानुवर्ष भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांवर होऊ शकते.

तसेच संबंधित परिसरात रोगराई निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. तरी पावसात भिजल्याने जंतुसंसर्ग होऊन भरतीसाठी आलेले तरुण आजारी पडू शकतात यामुळे पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे तरी या बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांचे विचार करून पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img