2.5 C
New York

Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर निलेश लंकेंचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य

Published:

छत्रपती संभाजी नगर

मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावे या मागणी करिता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारचे शिष्टमंडळ म्हणून आलेले शंभूराजे देसाई यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील एक महिन्याची राज्य सरकारला मुदत दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मनोज जरांगे यांच्या भेटी करिता राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी काल भेट घेतली होती. आज महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके ( Nilesh Lanka ) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरही लंके यांनी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

निलेश लंके म्हणाले की, मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारकडे सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल, असे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर तोडगा निघण्याची आवश्यकता असल्याचे मत नीलेश लंके यांनी व्यक्त केले. कागदोपत्री सर्व गोष्टींची पळवाटा सांगण्यापेक्षा लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. आपण किती वेळा कुठले तरी मुद्द्यावर कागदपत्र गोळा करतात पळवाट काढत राहणार आहे. आता सरकारने निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत मांडवाच लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मायबाप जनतेमुळेच मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी नक्कीच हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती लंके यांनी दिली.

निलेश लंके म्हणाले की, माझ्या मतदारसंघात देखील जरांगे पाटील यांच्यामुळे फायदा झाला आहे. स्वतःच्या जीवाची परवा न करता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला असल्याचे नीलेश लंके यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला असल्याची चर्चा आहे. यावर नीलेश लंके यांनी देखील वक्तव्य केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img