मुंबई
बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला ( Salman Khan ) गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी ( Threatened ) येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ( Lawrence Bishnoi Gang ) सलमान खानच्या मुंबईतील घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा सलमान खानला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने ( Mumbai Police) धमकी देणाऱ्या युवकाला राजस्थान मधून अटक केली आहे.
आता युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी देण्यात आलीये. या व्हिडीओनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे देखील कळतंय. बिश्नोई गॅंगच्या नावाने या व्हिडीओमध्ये धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात राजस्थान येथून बनवारीलाल गुजर या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस त्याला मुंबईत घेऊन येत आहेत.
बनवारीलाल गुजर वय 25 असे या आरोपीचे नाव आहे. युट्युबवरील धमकीचा व्हिडिओसमोर येताच गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आली. सलमान खान कुठे जातो याची व्हिडीओमध्ये बतावणी करत सलमानला मारण्याची धमकी देण्यात आली होती. व्हिडीओमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख देखीस करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने मुंबईत आणले आहे. आरोपीला आता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये.