23.1 C
New York

Uddhav Thackeray : मोदींच नरेटीव्ह खरं होतं का?, ठाकरेंचे जशास तसं उत्तर

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून जे नरेटीव्ह मांडलं गेलं ते काय खर नरेटीव्ह होत का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संविधान बदणार हे नरेटीव्ह तयार करण्यात आलं या आरोपाला उत्तर दिलं आहे. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. (Mahavikas Aghadi) तसंच, मंगळसुत्र पळवणार, म्हैस पळवणार, आरक्षण काढणार हे नरेटीव्ह खरे होते का ? असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर संविधान वाचवण्यासाठी सर्वधर्मियांनी इंडिया आघाडीला मतदान केलं असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray एकत्र निवडणूक लढणार

ही लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाही, संविधान वाचवण्यसाठी होती. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक काही अंतिम नव्हती. असं सोबत राहून काम करावं लागणार आहे असंही ठाकरे म्हणाले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी हे सरकार किती काळ टीकेल अशी शंकाही उपस्थित केली आहे. सकाळीच नाना पटोले यांनी काँग्रेस 288 विधानसभा निवडणुकांची तयारी करत आहे असं वक्तव्य केलं आहे. यावेळी ठाकरे यांनी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असं जाहीर केलं आहे.

सुनेत्रा पवारांचं राज्यसभा खासदार होताच मंत्रिपदावर भाष्य; म्हणाल्या

Uddhav Thackeray भाजपमुक्त राम झाला

नरेंद्र मोदी यांचं कसं बसं पंतप्रधान पद वाचलं आहे. कारण यांचा फोलपणा लोकांच्या लक्षात आला आहे. कारण यांच्या वागण्यात खरेपणा नाही. त्यामुळे या निवडणुकीत जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण होईल असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, जीथे राम आहे तीथे भाजप हारली. त्यामुळे भाजपमुक्त राम झाला आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मोदी गुजरात आणि बाकी देशामध्ये एक भिंत उभी करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray मोठा छोटा भाऊ असं नाही

लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली. धर्म जात हे राजकारण जनतेला पटलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्रात जे राजकारण यावेळी झालं ते दुर्दैवी होत असंही ते म्हणाले आहेत. मात्र, जनतेने जात, धर्म किंवा इतर फसव्या दाव्यांना नाकारून मतदान केलं असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. तसंच, विधानसभेला मोठा भाऊ छोटा भाऊ यामध्ये आम्ही जाणार नाही. जीथे चांगला उमेदवार तीथे त्यांचा उमेदवार असं आमचा सुत्र आहे अंसही चव्हाण यावेळी म्हणले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img