-0.8 C
New York

Koyna Express : कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह मुलीचा मृत्यू

Published:

मुंबईतून कोल्हापुरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसनं (Koyna Express) तीन महिलांना चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. ही घटना शुक्रवारी (१४ जून) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेमध्ये दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवण्याचे काम सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे. (Koyna Express) शुक्रवारी (१४ जून) रात्रीच्या सुमारास या दोन महिला आणि लहान मुलगी कुठे चालल्या होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या महिलांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईतून कोल्हापूरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रेल्वेने तीन जणांना चिरडले असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू या भीषण दुर्घटनेत झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. यामुळे ही दुर्घटना अपघात आहे की आत्महत्या? याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातील मार्केट यार्डपासून पुढं छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडं येत असताना कोयना एक्स्प्रेसची तिघींना जोराची धडक बसली. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचं चाक गेल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

…बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?

Koyna Express अंगावरुन चाक गेल्याने मृत्यू

मुंबईहून कोल्हापूर मार्गावर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातल्या मार्केट यार्डपासून पुढे छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडे येत असताना विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरून चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसची तिघींना जोराची धडक बसली. “रात्री उशिरापर्यंत या मृतांची ओळख पटली नाही. पोलिसांनी तिन्ही मृतदेह सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं,” अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img