राज्यात नुकतीच अनेक ठिकाणी मान्सूनला सुरुवात झाली आहे. (Dam Water) मात्र, पावसानं अनेक ठिकाणी ओढ दिल्याचं चित्र आहे. यामध्ये अनेक ठिकाणी पाणीसाठ्यात मोठी घट झालेली आहे. (Marathwada) त्यामुळे पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मराठवाडा विभागात 920 धरणांमध्ये 9.34 टक्के पाणीसाठा राहिला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 15 जून रोजी 678.39 दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे.
Marathwada पावसाची प्रतिक्षा कायम
दुसरीकडे सध्या पाहिलं तर राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढही होत आहे. यामध्ये नाशिक, नगरसह पुण्यातील धरणांमधील पाणी वाढत असून मराठवाडा विभागात 23.95 टिएमसी पाणी राहिले आहे. दरम्यान, हा पाणीसाठा मराठवाड्याच्या तुलनेने अधिकचा आहे. सध्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी ?
Marathwada जायकवाडीत 31.56 टक्के
यावर्षी पावसाच्या सरी वेळेवर आल्याने मराठवाड्यात उन्हाची रखरख काही प्रमाणात कमी झाली आहे. धरणांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. परंतु, यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा मोठ्या वेगाने कमी झाला. त्यामध्ये सध्या 5.65 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत 31.56 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Marathwada येलदरी धरणात 27 टक्के पाणी
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याली सिद्धेश्वर धरणाची स्थिती तर कठीण आहे. या धरणात अजूनही शुन्य टक्के जलसाठा राहिला आहे. त्याचबरोबर येलदरी धरणात 27 टक्के पाणी शिल्लक राहिला आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून या जिल्ह्यांमधील धरणप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत तापमान अधिक असल्याने यंदा धरण लवकर आटली होती.