उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातून एका मोठ्या अपघाताची (Uttarakhand accident) बातमी आली आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून अंदाजे 8 ते 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातग्रस्त वाहनामध्ये 23 प्रवासी होते. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ हा भीषण अपघात घडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथक घटनास्थळी रवाना झाले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह मुलीचा मृत्यू
Uttarakhand accident मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
या घडलेल्या भीषण अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घटलेली घटना अतिशय दुःखद असून, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना धामी यांनी केली आहे. तसेच स्थानिक प्रशासक आणि एसडीआरएपची टीम मदतीसाठी रवाना झाली असून, जखमींना जवळील रूग्णालयांमध्ये दाखल करण्यत आले असून, हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.