10.4 C
New York

T-20 world cup : खेळाडू, संघ व्यवस्थापन सारेच पाकिस्तानच्या अपयशाचे धनी -सुभाष हरचेकर

Published:

अमेरीका आणि भारताकडून पाठोपाठ दोन पराभव स्विकारलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूनी आयर्लंड विरूद्धच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या (T-20 world cup) साखळीतील अखेरच्या सामन्यासाठी फ्लोरीडामध्ये प्रचंड दडपणाखालीच पाऊल ठेवले. अमेरीकेवर आयर्लंड संघाने विजय मिळवला असता आणि पाकिस्तानने काहीशा कमजोर असलेल्या आयर्लंडवर विजय मिळवला असता तर सुपर आठमध्ये त्याना स्थान मिळाले असते. पण, नियतीला ते मान्य नव्हते. कारण फ्लोरीडामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत होता आणि या पावसामुळे अमेरीका आणि आयर्लंडमधील सामना एकही चेंडू न टाकल्यामुळे पाकिस्तान सुपर आठमध्ये स्थान मिळवण्यापासून वंचित राहिला.
पाकिस्तानने २०० ९ साली ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता आणि २०२२ साली इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे त्याना विजेतेपदाने हुलकावणी दिली. यंदाच्या वर्षातील ट्वेंटी- २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पाकिस्तान संघावर आज जी नामुष्कीची पाळी आली आहे, त्यास कर्णधार बाबर आझम आणि त्याचे अकरा सहकारी जबाबदार आहेत. अमेरीकेविरूद्ध पाकिस्तानने सात खेळाडूना गमावून १५९ धावा केल्या. पाकिस्तान संघात दर्जेदार गोलंदाज आहेत आणि त्यानी आपली कामगिरी वेळोवेळी उंचावली आहे. पण, त्या सामन्यात मात्र अमेरीकेच्या अननुभवी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात त्याना अपयश आले. त्यांचा हुकमी एक्का तेज गोलंदाज शाहीन शहा आफ्रीदीला एकही बळी मिळवता आला नाही तर महम्मद आमिर आणि नसीम खानला प्रत्येकी एकच बळी मिळवता आला. त्यामुळेच अमेरीकेची धावसंख्या तीन बाद १५९ अशी झाली. नियमाप्रमाणे सुपर ओवरचा निकष लावण्यात आला आणि यामध्ये मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तान संघाला दहा धावांवर रोखले. अमेरीकेने सहा चेंडूंत अठरा धावा केल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज आणि फलंदाज तसेच क्षेत्ररक्षक कमी पडले.

हेही वाचा : पावसाने केला खेळ! पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

T-20 world cup : एकोपा करणारा प्रशिक्षक नसावा

भारतीय संघाला एकोणीस षटकांत ११९ धावांवर गुंडाळण्यात पाकिस्तान गोलंदाज यशस्वी ठरले. पण हे विजयाचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांची मजल सात बाद ११३ धावांपर्यंतच गेली. महम्मद रिझवान फलंदाजी करत होता तेव्हा पकिस्तानची स्थिती चार बाद ८० अशी होती. तेव्हा त्याना ३६ चेंडूंत विजयासाठी चाळीस धावांची गरज होती. भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आऊटस्विंग महम्मद रिझवानला कळलाच नाही आणि त्याने बेजबाबदार फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो क्लीन बोल्ड झाला. येथेच पाकिस्तानच्या पराभवाची चाहूल लागली. मला वाटते पाकिस्तान संघात अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दांडगा अनुभव आहे. पण, भारतीय संघाच्या राहूल द्रविडसारखा संघाची बांधणी करून खेळाडूंमध्ये एकोपा करणारा प्रशिक्षक नसावा, असे वाटते. पाकिस्तान संघावर राजकारणी नेत्यांचा प्रभाव असल्याचे कारणही त्यामागे असावे, असे वाटते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img