-0.8 C
New York

Akhil Bhartiya Natya Parishad : नाट्य परिषदेकडून रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ यांना जीवनगौरव प्रदान!

Published:

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा (Akhil Bhartiya Natya Parishad) पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार दिला जातो. यावेळी यावर्षी अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘पुरस्कार वितरण समारंभ’ आज (दि 14 जून) रोजी सायं 6 वाजता यशवंत नाटय मंदिर मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला.

कोरोना त्याचबरोबर नाट्य परिषदेची रखडलेली निवडणूक. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित नियमक मंडळाने कमी वेळात तातडीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले आहेत. या कार्यक्रमाला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, त्याचबरोबर ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती होती. तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अतिशय धक्कादायक! आयस्क्रीममधून निघालं माणसाचं कापलेलं बोट

Akhil Bhartiya Natya Parishad जीवनगौरवसह इतर पुरस्कार वितरीत….

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्याचबरोबर अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं तसेच यावेळी इतर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये गणेश तळेकर – लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार, प्रशांत जोशी – डॉ. न. अ. बरवे स्मृति पुरस्कार, दिपाली घोंगे – कै. कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार, शशांक लिमये – श्रीमती शिबानी जोशी पुरस्कृत कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृति पुरस्कार,

विजय जगताप – शंकरराव भोसले पुरस्कृत बाळकृष्ण ध. भोसले स्मृति पुरस्कार, संजय देवधर – वि. स. खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्कार, गोविंद गोडबोले – कालिंदी केळुस्कर पुरस्कृत, अ.सी. केळुस्कर स्मृति पुरस्कार, अभिजीत झुंजारराव – कै. विनय आपटे कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार- प्रायोगिक नाट्य संस्था- अभिनय संस्था (कल्याण), प्रणित बोडके- सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक, अशोक ढेरे – नाट्य मंदार पुरस्कार, अशोक बेंडखळे- उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार, सुनील बेंडखळे – लोककलावंत पुरस्कार, श्याम आस्करकर- कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, स्व. रितेश साळुंखे – विशेष पुरस्कार (कार्यकर्ता) पुरस्कार आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img