21.9 C
New York

Vishwajit Kadam : …बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?

Published:

लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेचा मुद्दा राहिला तो सांगली लोकसभेचा. येथे उमेदवारीवरून जे काही रणकंदन सुरू होत ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. दरम्यान, तेथे अखेर अपक्ष उमेदवार असलेले पण काँग्रेसी विचारांचे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बाजी मारली. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा होत आहे. (Vishwajit Kadam) कालही सांगलीत रात्री सत्कार सोहळा पार पडला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेते मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून हा सत्कार सोहळा आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्वजित कदम यांच्या भाषणाने काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच प्रोत्साहित झाले.

Vishwajit Kadam रोख कुणाकडं

सांगलीतील काँग्रेस एकत्र करत सर्वांची आम्ही मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे सगळे विसरुन आम्ही एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि काँग्रेस नेत्यांसाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली. मात्र, आमची झालेली ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काहीजणांना बघवली नाही म्हणून त्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले अशा शब्दांत कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. परंतु, काँग्रेस विचारांच्या नागरिकांनी त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, विश्वजीत कदम यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

मुंबईत येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Vishwajit Kadam शब्द दिला तो पूर्ण ही केला

गेल्या 10 वर्षांमध्ये जिल्ह्याची विकासाच्या नावाखाली केवळ फसवणूक झाली. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांचा खासदार दिल्लीला पाठवणं गरजेचं होतं आणि आपण तो पाठवला आहे. पूर्वीचे विशाल पाटील आणि आत्ताचे विशाल पाटलामध्ये खूप चांगला फरक आहे. आम्ही विशाल पाटील यांना खासदार करू हा शब्द दिला तो पूर्ण ही केला. आता नवा विशाल पाटील सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी काम करून आपले स्वप्न पूर्ण करून दाखवेल असा विश्वास वाटतो असंही कदम यावेळी म्हणाले.

Vishwajit Kadam चार-पाच जागा लढणार

येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आणि जिंकणार असा विश्वासही कदम यांनी बोलून दाखवला. जिल्ह्याचे नेतृत्व जर आज सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी दिलंय तर माझं वचन आहे की, ज्यांनी ज्यांनी काँग्रेसद्वारे काम केलं त्याना चांगला न्याय देऊ. आता एक माणूस विशाल पाटील यांच्या रूपात लोकसभेत पाठवलाय, उद्या सांगली शहरातून दोन आमदार देखील विधानसभेत पाठवू, असा विश्वास कदम यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला . 22 तारखेला सांगली जिल्ह्याची नियोजन कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. विशाल पाटील यांची ही सांगलीतील पहिली बैठक असेल आणि विरोधकांची शेवटची बैठक असेल, असेही विश्वजीत कदम म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img