23.1 C
New York

Mumbai Ice Cream Case: अतिशय धक्कादायक! आयस्क्रीममधून निघालं माणसाचं कापलेलं बोट

Published:

Mumbai Ice Cream Case: अनेकवेळा खाद्यपदार्थामध्ये माश्या, कॉक्रोज नाही तर इतर घाण निघाल्याचे प्रकार घडतात. पण आता उन्हाळा म्हंटल की अनेकाना आईस्क्रीम खायला खूप आवडत. काहीजण तर थेट आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खातात तर काहीजण घरीच ऑनलाईन ऑर्डर देऊन थेट घरी मागवून खातात. पण, मुंबईमध्ये अशी एक घटना घडली आहे की तुम्हाला ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल.

हा काय आहे प्रकार ?
Mumbai Ice Cream Case: मुंबईमध्ये मालाड येथे राहणाऱ्या एका डॉक्टर तरुणाने ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं आणि घरी आल्यानंतर तो आईस्क्रीम खाऊ लागला त्यानंतर त्या आईस्क्रीममध्ये त्याला माणसाचं बोट आढळून आलं. हे बघून डॉक्टरच्या पायाखालची जमीन हादरली त्याला धक्काच बसला. त्या प्रकरणाबद्धल तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी त्वरित यम्मो आईस्क्रीम (Yummo Icecream) कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आईस्क्रीम आणि मानवी बोट फॉरेसिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या तरुणाचे नाव ब्रेंडन सेराओ (वय २७) आहे. हा तरुण एमबीबीएस डॉक्टर असून मुंबईतील मलाड येथे राहतो. बुधवारी त्याने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑनलाईन ऑर्डर केला आणि हा कोन त्याचा घरी आला. आईस्क्रीम आल्यानंतर त्याने सहज ते खायला सुरुवात केली आणि अर्ध आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याला खाण्यात काहीतरी कडक लागलं. आक्रोड, किंवा चॉकलेटचा तुकडा असावा असं त्याला वाटलं. मात्र त्याने आईस्क्रीम न खाता थेट ते पाहिलं.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? पॅकिंगसाठी काय योग्य जाणून घ्या

तक्रारदार म्हणतो, मला आता किळस येईल
काल आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मला घशाच्या खाली एकसुद्धा घास उतरला नाही. काहीच खायची माझी इच्छा नव्हती. माझ्या जिभेवर एखाद्या माणसाच्या अवयव कसा जाऊ शकतो असं मला वाटत होत. एका महिन्यापूर्वीचा तो आईस्क्रीम कोन होता. या आईस्क्रीममधली बॅच किती लोकांकडे गेली असेल. त्याचं रक्त कितीतरी आईस्क्रीम मध्ये गेलं असेल. ज्याचं बोट आहे त्या व्यक्तीला काय काय आजार असतील माहिती नाही. आता मला सुद्धा माझं ब्लड चेक करावं लागेल. आता आईस्क्रीमचा विषय कोणी काढला तरी मला किळस येईल.

पोलिस म्हणाले
या प्रकरणावर पोलिस म्हणाले, आमच्याकडे तक्रारदार आला आणि त्याला आईस्क्रीम खाताना एक ते दीड सेंटिमीटरचे बोट आढळले. हे आईस्क्रीम एमओ कंपनीचे आहे या कंपनीशी संबंधितांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. माणसाचं सापडलेलं बोट कोणाचं आहे हे तपातासानंतर सांगता येईल. दरम्यान आता, पोलीस त्या बोटाची डीएनए चाचणी आणि फोरेन्सिक तपास करणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img