21 C
New York

Beed Lok Sabha : ओबीसी कार्यकर्त्यांकडून भाजपला इशारा

Published:

बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha) अवघ्या 9 हजार मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय पुनर्वसन भाजपकडून (BJP) करण्यात यावे अशी मागणी ओबीसी (OBC) कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच जर पंकजा मुंडे यांचा राजकीय पुनर्वसन भाजपकडून झालं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदान करणार नाही असा इशाराही ओबीसी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ओबीसी कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत. त्या पराभूत झाल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे. भाजपच्या एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जे लोकांची समाजामध्ये काही काम नाहीत अशा लोकांना राज्यसभेवरती घेऊन त्यांना मंत्री पद दिले जातात. परंतु ज्या खऱ्या ओबीसीचे नेते आहेत त्यांचे पुनर्वसन केलं जात नाही. पंकजाताईंचे पुनर्वसन झाले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात काम करू. नुकतंच लोकसभा निवडणूका पार पडले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे मुंडे यांचा पराभव सहन न झाल्याने बीडमध्ये दोन जणांनी आत्महत्या केली होती.

पराभवाच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

यानंतर अहमदनगर येथील पांढरी पुल येथे पंकजा मुंडे यांना न्याय मिळावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ असलेल्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे. ज्या लोकांची समाजात काही काम नाही त्यांना राज्यसभेवरती घेऊन मंत्री पद दिली जात आहेत.

या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आहे तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये देखील काहींनी पक्षाच्या विरोधात काम करून पंकजाताईंना पराभूत केले होते. लोकसभेचे तिकीट देखील ताईंना पहिल्या यादीत जाहीर होणे अपेक्षित होते मात्र ते शेवट झाले. जाणीवपूर्वक पंकजाताईंना निकृष्ट पद्धतीची वागणूक दिली जात आहे. पंकजा यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद दिली नाही तर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे विरोधात आम्ही काम करू. भाजपच्या विरोधात मतदान करू असा इशारा देखील यावेळी ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img