यूनायटेड स्टेटस विरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ए ग्रुपमधील आमनेसामने असणार आहेत.मोनांक पटेल याच्याकडे यूएसएचं नेतृत्व आहे. तर पॉल स्टर्लिंग आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. आयर्लंडचा तिसरा आणि यूएसएचा हा चौथा सामना असणार आहे. यूएसए 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही.
यूएसएला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. अशात हा सामना निर्णायक ठरणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालावर पाकिस्ताचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानचं या सामन्याच्या निकालाकडे लक्ष असणार आहे. या सामन्यातून पाकिस्तानी संघाचे भवितव्य ठरणार आहे. आजचा सामना अमेरिकेने जिंकल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होईल. आयर्लंडचा विजय पाकिस्तानला स्पर्धेत जिवंत ठेवू शकतो.
T20 विश्वचषकात पाकिस्तान संघासमोर पावसाचे आव्हान
हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने शेजाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. आज अमेरिकेने विजय मिळवल्यास ते सहा गुणांसह सुपर-८ साठी पात्र ठरतील. जर आयर्लंडने अमेरिकेला पराभूत केल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान कायम राहील. त्यामुळे आजचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्हीही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. असे झाल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर होईल आणि अमेरिका अ गटातून सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल.
आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.
युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.