T20 वर्ल्ड कप 2024 टुर्नामेंटमध्ये भारत-अमेरिकेत (IND vs USA) न्यू यॉर्कमध्ये रोमांचक सामना झाला. भारताने 10 चेंडू आणि 7 विकेट राखून या मॅचमध्ये अमेरिकेवर विजय मिळवला. त्याचबरोबर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये सुद्धा क्वालिफाय केलय. केवळ 111 धावांच लक्ष्य अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी ठेवलं होतं. टीम इंडिया सोप लक्ष्य असूनही सहजतेने लक्ष्यापर्यंत पोहोचली नाही. अमेरिकी गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. टीम इंडियाला पहिला धक्का दिला विराट कोहलीच्या रुपाने मूळचा मुंबईकर असलेल्या अमेरिकेच्या सौरभ नेत्रवाळकरने दिला. विराटला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर रोहित शर्माला 3 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. सौरभने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. सौरभ नेत्रवाळकर स्वत:ला मात्र, तरीही दोष देत होता. त्यावर आता सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. त्यामध्ये सौरभ नेत्रवाळकरचा फोटो शेअर करत भाऊ तुला मानलं आणि मी खूप खुश आहे. असं सूर्यकुमार यादवने म्हंटले आहे.
Suryakumar Yadav सूर्या-नेत्रवाळकर कधी एकत्र खेळलेत
13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न सुर्याने आवश्यक धावगती वाढवण्यासाठी केला. त्याने नेत्रवाळकरकडे झेल दिला. पण त्याच्या हातातून ही महत्त्वाची कॅच सुटली. त्यानंतर सूर्या खूपच सावध झाला. सामन्यानंतर नेत्रवाळकरने ही कॅच सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली. सौरभ नेत्रवाळकर आणि सूर्यकुमार यादव अंडर-15 मध्ये एकत्र खेळले आहेत. त्याने या सगळ्याची जबाबदारी घेतली. भारतावर सूर्याची कॅच पकडली असती, तर दबाव वाढला असता असं नेत्रवाळकर म्हणाला.
इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो’ अमेरिकेचा स्टार झाला
Suryakumar Yadav टी-20 वर्ल्डकपमध्ये स्टार बनला सौरभ
एकेकाळी टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न पाहणारा सौरभ नेत्रावळकर अमेरिकन क्रिकेट टीमसाठी स्टार खेळाडू बनतोय. तो अंडर-19 मध्ये भारताकडून खेळला आहे आणि आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळतोय. कॅनडाविरुद्ध त्याला एकही विकेट मिळवता आली नाही पण अमेरिकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मोठ्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्याने उत्तम गोलंदाजी करत भारताविरुद्ध दबावही निर्माण केला. सॉफ्टवेअर इंजिनीयर सौरभ नेत्रावलकर सध्या ओरॅकलमध्ये काम करतो.