21 C
New York

T20 World Cup : टीम इंडियासाठी ‘हा’ सामना केवळ औपचारीक

Published:

सुभाष हरचेकर

आयसीसीच्या T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील साखळीचे सामने आता अंतिम ट्प्यात येऊन पोहोचले आहेत. अ गटातून भारतीय संघाने आपले तीनही सामने जिंकून सर्वाधीक सहा गुण मिळवत सुपर आठमध्ये आपले स्थान निच्छित केले आहे. साखळीतील भारतीय संघाचा अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री आठ वाजता खेळला जाणार आहे. हा सामनाही जिंकून साखळीत अपराजीत रहाण्याचा प्रयत्न कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी नक्कीच करतील. टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारीकपणाचा एक भाग असला तरी कर्णधार रोहित शर्मा कॅनडाला कमी लेखणार नाही. शेवटी ही विश्वचषक स्पर्धा आहे. भारतीय संघाच्या आधीचया सामन्यांतील कामगिरीवरून शनिवारचा सामना हा भारतीय संघासाठी सोपा पेपर असेल.

फ्लोरीडामधील ब्रोवर्ड कौंटी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून भारत आणि कॅनडा हे संघ T20या प्रकारात प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. कॅनडा संघाच्या सुपर आठमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाना केव्हाच सुरूंग लागला आहे. विश्वचषक जिंकण्याचा निर्धार करून अमेरीकेत पाऊल ठेवलेल्या भारतीय संघाला यापुढील प्रत्येक सामना काळजीपूर्वक खेळला पाहिजे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधीक धावा करून ऑरेंज कॅप मिळवली. पण विश्वचषक स्पर्धेत मात्र कोहलीला तिन सामन्यांतून १ , ४ , आणि शून्य अशा धावा करता आल्या आहेत. भारताचे इतर खेळाडू येथील बेभरंवशाच्या खेळपट्ट्यांशी जुळूवन घेत असले तरी कोहलीला मात्र अद्याप सूर गवसलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचा दांडगा अनुभव तो पणाला लावून यापुढील सामन्यांत आपला ठसा उमटवण्याची शक्यता आहे.

T20 विश्वचषकात पाकिस्तान संघासमोर पावसाचे आव्हान

ऋषभ पंतने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली निवड सार्थ ठरवली असून सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने अमेरीकेविरूद्ध नाबाद खेळी करून संघ व्यवस्थापनाची चिंता दूर केली असेल. हार्दिक पंडया आणि रवींद्र जडेजाला फलंदाजीत चांगली कामगिरी करत. आलेली नाही. जसप्रीत बुमराहने आपण विश्वातील महान तेज गोलंदाज का आहोत हे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून दाखवून दिले . समाधानाची बाब म्हणजे डावखुरा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग अचूक टप्पा आणि योग्य दिशेने गोलंदाजी करत आहे. या संघात चार अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे भारतीय संघाला त्यांच्या कामगिरीचा लाभच होईल. एकूणच शनिवारचा पेपर भारतीय संघासाठी पाऊस आला नाही तर सोपाच असेल .

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img