7.3 C
New York

Sushant Singh Rajput 4rth Death Anniversary: सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, १४ जुनला नक्की काय झालं होत?

Published:

Sushant Singh Rajput 4rth Death Anniversary : बॉलीवूडमधला प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सुशांत सिहं राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी सुद्धा अभिनेत्याच निधन मात्र एक रहस्यच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, अभिनेत्याच्या बहिणीने काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि व्हिडिओ मन हेलावून टाकणारे आहेत. बहिणीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत आनंदी राहताना दिसत आहे. तर भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेता सिंह हिने भावासाठी भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.

Sushant Singh Rajput 4rth Death Anniversary : आपल्या भावासोबतच्या आठवणी ताज्या करत श्वेता सिंह म्हणाली, की ‘भाई…. आज 4 वर्ष झालीत तू आम्हाला सोडून गेला आहेस आणि आम्हाला आजही नाही माहित की 14 जून 2020 रोजी नक्की झालं तरी काय होतं. तुझा मृत्यू अद्यापही रहस्य आहे. मला असहाय्य वाटत नेहमी आणि मी अनेक वेळा अधिकाऱ्यांना सत्यासाठी आवाहन केलं आहे. मी माझा संयम गमावत आहे आणि मला हार मानावीशी वाटतं आहे.

तब्बल २७ वर्षांनी मेजर कुलदीप येतोय तुमच्या भेटीला; ‘बॉर्डर २’ची घोषणा

पुढे सुशांतची बहीण म्हणाली, की ‘पण आज, शेवटच्या वेळी, या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला विचारायचे आहे, तुमच्या मनावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा: आमचा भाऊ सुशांतचं नक्की काय झालं होत हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का? हा राजकीय अजेंडा का बनला आहे? त्या दिवशी जे सापडलं आणि जे काही घडलंय ते सांगण्याइतकं सोपं का असू शकत नाही? … सध्या सर्वत्र श्वेता सिंह हिच्या पोस्टची चर्चा रंगताना दिसत आहे.

सांगायचंच झालं तर, आजच्या दिवशी २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील राहात्या घरी मृत अवस्थेत आढळला. सुशांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. चाहत्यांना देखील या बातमीचा मोठा धक्का बसला होता. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. बॉलीवूड मधल्या सर्व कलाकारांना सुद्धा धक्का बसल्याच पाहायला मिळालं होत.

सुशांत सिहं राजपूतच्या निधनानंतर बरेच सेलिब्रिटी देखील जाळ्यात अडकले होते. अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी अनेकांची चौकशी देखील झाली होती. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. पण अभिनेत्याने यशाच्या पायरीवर असताना का टोकाचं पाऊल उचललं? याचं कारण ४ वर्षानंतर देखील अद्याप समोर आलेलं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img