19.7 C
New York

T20 World Cup : T20 विश्वचषकात पाकिस्तान संघासमोर पावसाचे आव्हान

Published:

– सुभाष हरचेकर

वेस्ट इंडिज आणि अमेरीकेत सुरू असलेल्या T20 विश्वचषकातील (T20 World Cup) नेपाळ आणि श्रीलंकेमधील सामना नाणेफेक न होता पावसाच्या व्यत्ययामुळे पंचानी सोडून दिला. या निकालामुळे उभय संघाना प्र्त्येकी एक गुण मिळाला. याआधी वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथील इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सामनाही पावसामुळे सोडून देण्यात आला होता. मंगळवारचा सामना हा अमेरीकेतील लॉडरहील येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम वर खेळला जाणार होता. T20 विश्वचषक स्पर्धेतील लॉडरहीलवरचा हा पहिलाच सामना होता आणि तो एकही चेंडू न टाकता सोडून देण्यात आल्यामुळे असंख्य क्रिकेट प्रेमींची निराशा झाली.

श्रीलंकेसाठी हा निकाल घातक ठरणार आहे . बांगलादेश आणि दक्षिण आफ्रीका संघांकडून सामने गमावल्यामुळे श्रीलंकेला नेपाळ आणि नेदरलँडविरूद्ध विजय मिळवणे आवश्यक होते. ड गटातून दक्षिण आफ्रीकेचे तीन विजयांसह सहा तर बांगला देश आणि नेदरलँडचे एका विजयासह दोन गुण झाले आहेत. लॉडरहीलवर यापुढील सामना १५ जूनला भारत आणि कॅनडा संघांमध्ये खेळला जाईल तर १६ जूनला याच मैदानावर पाकिस्तान आणि आयर्लंडमध्ये सामना होणार आहे. त्याआधी १४ जूनला अमेरीका आणि आयर्लंडमधील सामनाही लॉडरहीलमधील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्कवर खेळला जाणार आहे. तो सामना अमेरीकेने जिंकला आणि भारतीय संघाने कॅनडा विरूद्ध विजय मिळवला तर पाकिस्तानने उर्वरित सामना जिंकला तरी त्याना सुपर आठमध्ये स्थान मिळणार नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारत आणि अमेरीकेला प्रत्येकी एक गुण जरी मिळाला तरी ते दोन संघ सुपर आठमध्ये स्थान मिळवू शकतील.

सूर्या कोणाला म्हणाला ‘भाऊ मानलं तुला’ ?

वेधशाळेने दिलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार लॉडरहीलमधील सामन्या दरम्यान पावसाची उपस्थिती असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान हे बरेचसे पावसावर अवलंबून आहे. अमेरीका संघाचे तीन सामन्यांतून चार गुण झाले असून पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत.पाकिस्तानने आयर्लंड विरूद्ध विजय मिळवला तर त्यांचेही चार गुण होतील. त्याचवेळी आयर्लंडने अमेरीका संघाला पराभवाचा धकका दिला तर मग नेट रनरेटचा निकष लावण्यात येईल आणि त्यामध्ये पाकिस्तानचा संघ सरस ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img