19.7 C
New York

Nilesh Lanka : गुंड गजा मारणेंच्या भेटीवर निलेश लंकेचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Published:

अहिल्यादेवी नगर

पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gund Gajanan Marne) याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार अहिल्यादेवी नगरचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. निलेश लंके यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय. 

निलेश लंके म्हणाले की, मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली.

निलेश लंके म्हणाले की, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहीत नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही. माझ्या मतदार संघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारणेची मदत झाल्याचा प्रश्नच येत नाही, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img