19.7 C
New York

Aunskuar Ghat Landslide : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली वाहतूक बंद

Published:

रत्नागिरी

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील अणुस्कुरा घाटात (Aunskuar Ghat Landslide) गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे कोकणातून कोल्हापूर ला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दरड हटवण्याचे काम आज शुक्रवारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. दरम्यान, घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img