23.1 C
New York

Pendharkar College : के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयात संचालकांच्या फतव्यामुळे नाराजी

Published:

डोंबिवली ( शंकर जाधव )

के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय (Pendharkar College) विनानुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनिअर आणि डिग्री महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवल्याचा आरोप करत शुक्रवार १४ तारखेला महाविद्यालयाच्या समोर माजी विद्यार्थी राजकीय नेतेमंडळीनी बेमुदत साखळी केले.यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ही उपोषणाकर्त्यांची घेतली भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.म्हात्रे यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापनाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांना व शिक्षकांना आमचा पाठिंबा आहे. शिक्षकांची बाजू घेत या महविद्यालयात प्रशासकीय राजवट लागू करा अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

या उपोषणात पेंढारकर कॉलेज बचाव मोहिमेचे संयोजक सोनू सरवसे, विशाल शेटे,भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष राजू शेख, संदीप शर्मा, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, गुलाब वझे, बंडू पाटील आदि बेमुद उपोषणात सहभागी झाले होते.यावेळी संयोजक सोनू सरवसे म्हणाले, हे कॉलेज अनुदानित आहे.ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे.त्याला सरकारी मान्यता नाही.मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरु आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे.त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात उपोषण केले.

गुंड गजा मारणेंच्या भेटीवर निलेश लंकेचं स्पष्टीकरण, म्हणाले.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, मी मुंबईचे कुलगुरूंशी यासंदर्भात चर्चा करणार आहे.त्यांच्याकडे २०१५ सालीच कारवाईची सूचना होती तर कारवाई का झाली नाही. जर कारवाई केली नसेल तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे हे प्रशासन व युनिव्हर्सिटी यांना बोलावून जाब विचारला पाहिजे.शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व माजी विद्यार्थी, शिक्षक संघटना पाठ्शी राहून न्याय मिळवून देऊ. या महाविद्यालयात अनेक गरीब विद्यार्थी शिकत आहे. अनेक शिक्षक हे अनुदानावर शिकवीत आहेत. आज या प्रशासनाने अनुदानित तत्वावरील तुकड्या करून बंद करून या ठिकाणी विनाअनुदानित तुकड्यांन परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे परवानगी मागितली आहे यातून त्यांना फार मोठ्या प्रमाणात पैसा जमा करायचा घाट घातला आहे. सर्व शिक्षकांना एका वर्ग खोलीत बसविले आहे. मागच्या महिन्यापासून त्यांना पगार नाही. हे २०१५ यावर प्रशासकीय राजवट लागू करावी अशी मागणी झाली होती.त्याला विद्यापीठाकडून परवानगी मिळाली होती.

भाजप कल्याण लोकसभा निवडणून प्रमुख शशिकांत कांबळे म्हणाले, या महाविद्यालयाच्या ट्रस्टीकडून पूर्वीपासून दादागिरी केली जाते . या महाविद्यालयात बाउन्सर ठेवले आहे. कुठल्या महाविद्यालयात बाउन्सर ठेवतात का ? हि मनमानी भाजपा सहन करणार नाही. यांची मानसिकता हाणून पडण्यासाठी आम्ही आलो आहोत. सरकारच्या त्याच्या पाठीशी आहे. तर शिवसेनेचे गुलाब वझे म्हणाले, डोंबिवलीत या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. या महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. अनुदानित तुकड्या बंद करण्याची परवानगी मागितली. हे जर डोंबिवलीत झाले तर इतर शहरातहि सुऊ होईल. आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितले. येथे प्रशासकिय राजवट लागू करावी.

माजी विद्यार्थी हे शिक्षकांच्या प्रेमापोटी येथे आले असतील. त्यामुळे त्याबद्दल माझे काही मत नाही. पेंढारकर महाविद्यालया बाबत सोशल मीडियावर जे काही बाहेर आले ते आरोप सत्य नाही आणि तसे काही मी मानतही नाही. त्यांच्यावर माझा लेखी व तोंडी आरोप एकच होता की नियमानुसार सात तास शिक्षकांनी शिकवणे अपेक्षित होते. त्यामुळे वेतनात फरक आढळतो. विद्यार्थी येथे उपस्थित राहिले असतील पण विद्यार्थ्यांसाठी त्या दर्जाच्या शिक्षक नियमांचा आमचा प्रयत्न आहे आणि 20-20 पॉलिसी प्रमाणे आम्ही काम करत आहोत. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी माझं काही बोलणं झाल नाही ते आले ना की नाही ते मला माहिती नाही ते येऊन गेले असे मला कळलं.आमदारांना इकडे यायला मी बंदी घातली नाही. माझे वय झाले असल्याने मी तिकडे येणार नाही एवढंच उत्तर मी दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img