मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. ओबीसी नेते खोटं बोलतात. माहितीही चुकीची सांगतात. परंतु, जर खरी परिस्थिती पाहिली तर राज्यात मोठा मराठा वर्ग आरक्षणात म्हणजे ओबीसीत गेलेला आहे. विदर्भात मराठा समाज ओबीसीत आहे, कोकणात आहे, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक मराठे ओबीसीत आहेत. आणि काही यावेळी सुरू असलेल्या नोदींमध्ये गेले आहेत. त्यामुळे अत्यंत अल्प मराठ समाज ओबीसी मध्ये जाणं बाकी आहे. त्यामुळे सर्व ओबीसी नेत्यांनी विरोध न करता आम्हाला साथ द्यावी आणि ओबीसीमध्ये सामावून घ्यावं असं आवाहन करत त्यांनी सामाजिक सलोखा राखावा असंही जरांगे म्हणाले आहेत.
Manoj Jarange आम्हीही विरोधात बोलणार नाहीत
मी कोणाचाचं नाही. मी फक्त मराठा समाजाचा आहे. तसंच, मी कशालाच भीत नाही. जेलमध्ये जायला भेत नाही. त्यामुळे मी कुणापुढे झुकणारा नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसंच, आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर जे विरोध करत आहेत ते सातत्याने विरोधात बोलत असल्याने आम्ही बोलतो. त्यांनी विरोधात बोलणं बंद कराव मग आम्हीही करू असंही जरांगे म्हणाले आहेत.
फेअर प्ले अॅप गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापेमारी
Manoj Jarange गावी जाणार
उपचार संपूर्ण झाल्यानंतर आम्ही शाहगडला म्हणजे गावी जाणार आहोत. त्या ठिकाणी सर्व काम मार्गी लावण्यासाठी एक कार्यालयाची स्थापना करायची आहे अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. तसंच, तुम्ही आता अंतरवाली सोडणार का? असा प्रश्न विचारला असता आजपर्यंत अंतरवाली सराटीने दिलेली साथ आम्ही कधीच विसरणार नाही. मात्र, आता मोठी गर्दी होत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. हे लक्षात घेऊन आम्ही शाहगडला जाण्याचा निर्णय घेतला. कारण वर्दळ कमी व्हावी अशी आमची योजना आहे असंही ते म्हणाले.
Manoj Jarange आता उपोषण नको
गेली 10 महिन्यांपासून मी आंदोलन करतोय. माझ्या शरिरातून रक्त निघना. आणि किती दिवस आंदोलन कराव? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. परंतु, 10 महिने हे देशातील मोठं आंदोलन होतं. त्यामुळे आता किती आंदोलन करायला लावता असं म्हणताना जर या सरकारने आता नाहीच ऐकलं तर पुन्हा एखाद्या डोंगरावर आंदोलन करणार. कारण लोकांसाठी आंदोलन करतोय. मग ते कुठंही केलं तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आता आंदोलन करायची वेळ आली तर कुठल्यातरी डोंगरावर आंदोलन करणार असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.