नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, त्यांची ही विनंती नाकारण्यात आली. त्यानंतर आज (दि.14) पार पडेलेल्या भाजपच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही असे म्हणत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
फडणवीस म्हणाले की, पराभवाच्या मंथन बैठकीत रणनीतीसुध्दा करायला हवी तसेच रणनीती करण्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करा असेही फडणवीस म्हणाले. आपल्यावर आभाळ कोसळलेले नसून विरोधकांनी जे चुकीचं नरेटिव्ह पसरवलं आहे ते खोडून काढा अशा सूचनाही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मंथन बैठकीत वक्तव्य, विश्लेषण करून चालत नाही तरस रणनीती असावी लागते असा महत्त्वाचा मुद्दा फडणवीसांनी उपस्थित केला.
आपल्याला राज्यात केवळ दोन लाख मते कमी असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत दोन लाख मते अधिक तसेच 130 विधानसभा मतदारसंघात आघाडी असल्याचे प्रचंड ध्रवीकरण आपलं झालेले आहे. आपली संख्या कमी झाली. संविधान बदलणार हा नेरटिव्ह सेट करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पराभवाच्या मंथन बैठकीत रणनीतीसुध्दा करायला हवी तसेच रणनीती करण्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करा असेही फडणवीस म्हणाले. आपल्यावर आभाळ कोसळलेले नसून विरोधकांनी जे चुकीचं नरेटिव्ह पसरवलं आहे ते खोडून काढा अशा सूचनाही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis फेक नरेटिव्ह एकदाच चालतो
तत्पूर्वी काल (दि.13) लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून (BJP) मुंबईमध्ये भाजपा विजय संकल्प मेळावा (BJP Vijay Sankalp Melawa) आयोजित करण्यात आला होता. यात संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा फक्त भाजपला मिळाल्या आहेत. फेक नॅरेटिव्हमुळे काही जागांवर आपल्याला नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले या फेक नरेटिव्हला आपल्याला सोशल मीडियावर उत्तर देता आलं नाही त्यामुळे आपला काही जागांवर पराभव झाला. मात्र, फेक नरेटिव्ह एकदाच चालतो पुन्हा पुन्हा चालणार नाही असे म्हणत ‘वी आर बाउन्स बॅक, येस महाराष्ट्रात वी आर डाउन बट नॉटआऊट असं फडणवीस म्हणाले.
‘
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, निवडणुकीचे विश्लेषण नुसते करून चालत नाही, रणनीती सुद्धा हवी, त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे लागते. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले आहे आणि विजयाचा नवीन संकल्प पाहायला मिळाला आहे. कमी मते मिळाली म्हणून आभाळ कोसळलेले नाही. केवळ 2 लाख मते राज्यात कमी आहे. तर मुंबईत तर 2 लाख मते अधिक आहेत. तर 130 विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळालेली आहे. निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून प्रचंड ध्रुवीकरण झाले. त्यामुळे आपली संख्या कमी झाली आहे. संविधान बदलणार हा नरेटिव्ह पहिल्या तीन टप्प्यात तीव्रता अधिक होती. त्यामुळे 24 पैकी केवळ 4 जागा आपण जिंकू शकलो. नंतर आपण त्याला प्रतिवाद केला आणि पुढच्या 24 जागांपैकी 13 जागा मिळाल्या.
Devendra Fadnavis नरेटिव्ह खोडून काढा
काल परवा महाराष्ट्राला कमी निधी मिळाला असा नरेटिव्ह तयार करण्यात आला आहे. परंतु
खरं तर आधी महाराष्ट्राला 5.1% निधी मिळायचा, आता 6.3% निधी मिळतो आहे.. त्याच्या वाटपाचे निकष वित्त आयोग ठरविते.
वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात फक्त 2 कोटी रुपयेच दिले आहे.
BDD चाळीतील लॉटरी काढली नाही, असे सांगण्यात येत आहे. लॉटरी ही 20 मे रोजीच होती. पण मतदान असल्याने पुढे ढकलली गेली. ती होणारच आहे.