20 C
New York

Nagpur Marathwada Airline : मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी!

Published:

विदर्भतील लोकांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा सुरू (Nagpur Marathwada Airline) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Airline ) ही विमानसेवा नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू आहे. (Nagpur) त्यानंतर काही तासांचं अंतर मिनिटांव येईल. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Nagpur Marathwada Airline दोन प्रदेश अधिक जवळ

२७ जूनपासून स्टार एअरची नागपूर ते नांदेड विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी चार दिवस ही विमानसेवा असणार आहे. इंडिगो एअरलाईन्स विमानसेवा नागपूर ते छत्रपती संभाजीनगर 2 जुलैपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांदरम्यान विमानसेवा सुरू होत असल्यामुळे हे दोन प्रदेश अधिक जवळ येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

शिखर बँक क्लोजर रिपोर्टचा उल्लेख करत राऊतांनी साधलं टायमिंग

Nagpur Marathwada Airline अंतर काही मिनीटांत पार होणार

या दोन प्रदेशातील अतिशय महत्वाची आर्थिक केंद्र नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे विदर्भ आणि मराठवाडा आहेत. मोठ्या प्रमाणात व्यापार या दोन्ही शहरांदरम्यान रोज होतो. त्यासाठी नागपूर ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग होत असल्याचं पाहायला मिळतं. या दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी किमान बारा आणि किंवा त्यापेक्षाही जास्त तास लागतात. परंतु, ही विमानसेवा सुरू होत असल्याने आता हे अंतर काही मिनीटांत पार होणार आहे.

Nagpur Marathwada Airline नांदेड ते नागपूर

छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अशी थेट रेल्वेसेवा नाही. त्यामुळे थोड्या रेल्वे छत्रपती संभाजीनगर येथे थांबतात. त्यामुळे असा प्रवास करणं जास्त कठीण आणि वेळखाऊ आहे. या प्रवासात खासगी ट्रॅव्हल्सपेक्षाही जास्त वेळ जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसत आहे. परंतु, आता या सर्व समस्या सुटणार आहेत. कारण विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड ते नागपूर ५० मिनिट आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ अवघ्या १ तासात पूर्ण होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img