3.5 C
New York

FairPlay App : फेअर प्ले अॅप गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापेमारी

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. देश-परदेशातील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून फेअर प्ले ॲपशी (FairPlay App) संबंधित मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) 19 ठिकाणी छापेमारी (Raid) केली या छापेमाधिदरम्यान ईडीने (ED) काही कागदपत्रासह 8 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेअर प्ले ॲपशी संबंधित ईडीने 19 ठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराशी निगडित कागदपत्रे हस्तगत केली. या व्यवहारांसाठी वापर झालेल्या सुमारे 400 बँक खात्यांचे तपशील मिळाले असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अवैधपणे आयपीएलचे प्रसारण केल्याबद्दल वयकॉम 18 च्या तक्रारीवरून अलीकडेच सायबर महाराष्ट्रने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा नोंदवला होता. या ॲपची जाहिरात केल्याबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतील काही तारे-तारकांचीही चौकशी सुरू होती. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने प्रकरण नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या ॲपद्वारे क्रिकेट सामन्यांसोबत लोकसभा निवडणुकीवर ऑनलाईन बेटिंग सुरू होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img