23.1 C
New York

T20 World Cup : बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?

Published:

T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) खराब कामगिरीमुळे पाकिस्तान (Pakistan ) क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि भारतासोबत (India) च्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवामुळे माजी खेळाडूंसह पाकिस्तान क्रिकेट चहा त्यांनी टीमवर जोरदार टीका केली.

सामन्यांमधील या अडचणी काही कमी होत्या म्हणून आता कर्णधार बाबराझमसह पूर्ण टीम जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की भारतासोबत झालेला सामना हरल्यामुळे पाकिस्तानमध्ये एका वकिलाने या सर्व खेळाडूं सह कोच आणि स्टाफ विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानातील गुजरांवाला शहरामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या वकिलाने टीमवर गंभीर आरोप करत. अमेरिका आणि भारताविरुद्धच्या सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवाने आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचे सांगितलं.

आज होणार यूएसए विरुद्ध आयर्लंड निर्णायक सामना

एवढंच नाही तर या वकिलाकडून पाकिस्तानच्या पराभवाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. तसेच ही चौकशी होईपर्यंत पाकिस्तानच्या संपूर्ण क्रिकेट टीमवर बहिष्कार टाकण्यात यावा. अशी देखील मागणी या वकिलाकडून करण्यात आली आहे. ही याचिका मंजूर झाली असून त्यामुळे t20 वर्ल्ड कप नंतर पाकिस्तान क्रिकेट टीम जेलमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जातआ आहे.

दरम्यान टीम इंडियाकडून लाजिरवाणा (Team India) पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर जबरदस्त कारवाई होणार हे निश्चित झालं आहे. विश्वचषकात सलग दोन पराभव स्वीकारलेल्या पाकिस्तान संघावर आता सुपर 8 मध्ये पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंना धक्का देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img