-0.1 C
New York

Monsoon Update : मुंबईत येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Published:

राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. (Monsoon Update) मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. तसेच राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

Monsoon Update मुंबई, उपनगरांमध्ये पाऊस

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. दादर परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवस आधीच नैऋत्य मौसमी वारे मुंबईत दाखल झाले होते. मान्सूनचं आगमन होताच मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पुन्हा उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. मुंबईत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पावसाचा जोर ओसरला होता. दरम्यान, मुंबईसह पश्चिम उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यसभेच्या दहा जागांचं पॉलिटिक्स काय आहे ?

वांद्रे, दादर, वरळी परिसरात सकाळी ७ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. चार दिवसांचा खंड पडल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे नोकरदारवर्गाची तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबई तसेच उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.मुंबईत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पावसाचा जोर ओसरला होता.दरम्यान, मुंबईसह पश्चिम उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी वाऱ्यांनी कोकण, मराठवाडा तसेच विदर्भाच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. गुरुवारी मोसमी वाऱ्यांची वाटचाल जैसे थे होती. मोसमी वाऱ्यांचा बंगालच्या उपसागरातील वेग मंदावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img