22.3 C
New York

Sushant Singh Rajput : सुशांतच्या डेथ एनिवर्सरीनिमित्त अंकिताने केला ‘हा’ फोटो शेअर

Published:

सुशांतची (Sushant Singh Rajput) आज चौथी डेथ एनिवर्सरी आहे. अनेक मित्र, कुटुंबीय आणि चाहते त्याच्यासोबतच्या आठवणींना यानिमित्त त्याचे उजाळा देताना दिसत आहेत. सुशांतने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सगळ्यांची मने जिंकली आहेत. तो कायमच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. सुशांत सिंग नेहमीच एक हसमुख व्यक्तीमत्व म्हणून चाहत्यांमध्ये फेमस होता. सुशांतचे आडनाव राजपूत नाही तर ‘गुलशन’ आहे. ही गोष्ट अनेकांना माहित नाही. टेलिव्हिजन सीरियलमधून सुशांतने आपल्या सिने करियरची सुरुवात केली. २००८ मध्ये स्टार प्लसवरील रोमँटिक ड्रामा ‘किस देश में है मेरा दिल’ हा त्याचा पहिला शो होता. त्यानंतर झी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘पवित्र रिश्ता’ने सुशांतला प्रसिद्धी दिली.

14 जून 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे येथील घरात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी शोक व्यक्त केला. पण अभिनेत्याने टोकाचं पाऊल का उचलंल याबद्दल निधनाच्या इतक्या वर्षांनंतर देखील काही कळलेलं नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. सुशांत कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत

सोशल मीडियावर आजही अभिनेत्याचे जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आता ‘पवित्र रिश्ता’ मधील सहकलाकारी अंकिता लोखंडे आणि सुशांत 2010 पासून ते 2016 पर्यंत ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्याच्या आठवणीत अंकिताने सुशांतचा एक फोटो शेअर करत आठणींना उजाळा दिला आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत या दोघांची मैत्री देखील पक्की असल्याचं आपण अनेकदा पहिलं आहे. सुशांतच्या जाण्याला ४ वर्ष होऊनही अजूनही अंकिता लोखंडे नेहमी कॅमऱ्यासमोर त्याच्या आठणींना उजाळा देताना पाहायला मिळते. सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर सुशांत याने इतकं मोठं पाऊल का उचललं? यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img