23.1 C
New York

Aluminium Foil paper or butter paper: अ‍ॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? पॅकिंगसाठी काय योग्य जाणून घ्या

Published:

Aluminium Foil paper or butter paper: पराठे, चपाती, डोसा हे पदार्थ उबदार ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा (Aluminium Foil paper) वापर केला जातो. त्याचबरोबर आपण घरातून मुलांना किंवा ऑफिसला डब्बा घेऊन जाताना चपातीसाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. असं केल्याने चपाती, पराठे किंवा डोसा असो हे पदार्थ गरम राहतात. पण, तुम्हाला हे माहितेय का ॲल्युमिनियम फॉइल तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकत. प्रवासात असूदेत नाही तर ऑफिसला आपण अन्न पॅक करण्यासाठी अनेकवेळा ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करतो. पण, या सगळ्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो किंवा होऊ शकतो याचा कधी विचार केला का तुम्ही ? आपण अनेकवेळा हाच विचार करतो की, त्यात अन्न गुंडाळून ठेवल्याने अन्न गरम राहतं, परंतु अन्न पॅकिंग पेपरमध्ये पॅक करणं आरोग्यासाठी चांगले आहे का ? मग नक्कीच जाणून घेऊया.

ॲल्युमिनियम फॉइल पेपर आरोग्यासाठी हानिकारक
Aluminium Foil paper or butter paper: खरं तर, प्रत्येकाच्या सोयीनुसार ॲल्युमिनियम फॉइल अन्न पॅक करण्यासाठी चांगले आहे. परंतु, अलीकडेच याबद्दल एक संशोधन समोर आले आहे, ज्या गोष्टीने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स ॲल्युमिनियम फॉइल’नुसार, ॲल्युमिनियम फॉइल पेपर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे जे अन्न कणांचे ऑक्सिडायझेशन करते, ज्याच्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकत. आता प्रश्न असा पडतो की या दोघांपैकी कोणता पेपर चांगला? ॲल्युमिनियम फॉइल पेपर की बटर पेपर?

पावसाळ्यात घ्या केसांची ‘अशी’ काळजी!

या आजाराची भीती
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स ॲल्युमिनियम फॉइल’नुसार ॲल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये अन्न पॅक करण्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण गरम अन्न ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतो तेव्हा आजारांची भीती वाढते, आणि त्यामुळे हाडांचे आणि मेंदूचे खूप नुकसान होते.

बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम फॉइल पेपर वापरणे चांगलं आहे का?
बटर पेपर हा रॅपिंग पेपर किंवा सँडविच पेपर या नावाने ओळखला जातो. हे ॲल्युमिनियम फॉइल पेपरपेक्षा चांगला आहे. बटर पेपर हा नॉन-स्टिक पेपरसारखा असतो, आणि त्यात कागद असतो. हॉटेलमध्ये किंवा मिठाईच्या दुकानात याचा वापर जास्त केला जातो. बटर पेपर हा अन्नातील अतिरिक्त तेलदेखील शोषून घेतो त्यामुळे बटर पेपरला आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जर तुम्हाला मसालेदार, खारट असणारे पदार्थ, किंवा व्हिटॅमिन सी फूड गुंडाळायचं असेल तर त्यासाठी बटर पेपर हा एक उत्तम पर्याय आहे. बटर पेपर हा ॲल्युमिनियम पेपरपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img