26.9 C
New York

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा भाजपची मागणी

Published:

जालना

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यानंतर आता महायुतीतील वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी सिल्लोड तालुक्यातील भाजपचे (BJP) पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना पत्राद्वारे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात काम केले. त्यांनी निवडणुकीत युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे सिल्लोड तालुका शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. यासंदर्भात कटारिया यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने रावसाहेब दानवे यांचा एक लाखाच्या अधिक मताने पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी काम केल्याचा आरोप करत राजीनामेची मागणी भाजप तालुकाध्यक्ष यांनी केली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

नुकत्याच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्यात त्यात आपल्या पक्षाची सत्ता आली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधानपदी विराजित झाले. त्यांच्या विजयात बाम्हाला अपेक्षित वाटा उचलता आला नाही याची सल मनात आहे. कारण आमच्या लोकसभा मतदारसंघात आम्हाला अपेक्षित मत मिळवून देता आली नाही असं कटारिया यांनी म्हटलं आहे.

एकगठ्ठा मुस्लिम मते, आरक्षणाच्या विषयावरून नाराजी या सोबतच सिल्लोड विधानसभा मतदार संघात एक अजून कारण म्हणजे महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधात केलेले काम. निवडणुकीच्या काळात दोन अगोदर पासून अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस उमेदवाराचे उघड-उघड काम केल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img